Shinde Group VS Bjp : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडूनच तीव्र विरोध करण्यात आला होता. यामुळे या ठिकाणी महायुतीकडून नेमका काय निर्णय होणार? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
फडणवीसांच्या या घोषणानेनंतर कल्याणमधील राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. श्रीकांत यांना उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटाने भाजपच्या आमदाराची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
नागपूरमध्ये भाजपच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना कल्याणच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट केले. | Shinde Group VS Bjp
शिंदे गटाकडून भाजप आमदाराच्या हकालपट्टीची मागणी
शिंदे गटातील युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. अनेक भाजपचे कार्यकर्ते नाहक श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत. यामधील अनेक कार्यकर्ते गणपत गायकवाड यांचे समर्थक आहेत, असा आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला.भाजपने गणपत गायकवाड यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी केली पाहिजे. अशा गुंड प्रवृत्तीला पक्षात ठेवणं योग्य नाही. त्यांची हकापट्टी करणं हेच युतीसाठी योग्य राहील, असं देखील म्हात्रे यांनी म्हटलं आहे. | Shinde Group VS Bjp
फडणवीसांनी जाहीर केली श्रीकांत शिंदेंची उमेदवारी
भाजपकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कोणताही विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. पूर्ण ताकदीने आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही निवडून आणू. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे महायुतीचा कल्याणमधील तिढा संपल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. | Shinde Group VS Bjp
“रामाचे नाव घेऊन नथुरामाचा अजेंडा” काँग्रेस नेत्याचा भाजपवर हल्लाबोल
“रा. स्व.संघाच्या सर्वेनुसार भाजपला 200 जागाही मिळणे कठीण” बड्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं