पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार : हडपसर, काळेपडळ येथे प्रचार
हडपसर – सत्ताधारी आणि विरोधक फक्त मते मागण्यासाठी येतात. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्याम बापू हाके यांनी आजही आणि यापूर्वीही आमच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आवश्यकतेनुसार मदतही केली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी हाके यांना निवडून देण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.
हडपसर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्याम बापू हाके यांच्या प्रचारार्थ हडपसर-काळेपडळ भागातून पदयात्रा काढली. त्यांनी पीएमपी बसने प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच कूचकामी ठरत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे संकट निर्माण झाले असून याला आजवरच्या लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमता कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले.