सुवर्णपदक हुकले तरीही मेरी कोमचा वर्ल्ड रेकॉर्ड 

मॉस्को – भारताची अव्वल मुष्टियुद्धपटू सुपरमॉम मेरी कोमचे महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुर्वणपदकाचे स्वप्न अर्धवट राहिले. उपांत्य फेरीत आज ५१ किलो वजनी गटात टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने मेरी कोमचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. यामुळे मेरी कोमला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. बुसेन्झ कैरोग्लुने ४-१ ने मेरीचा पराभव केला.

जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत मेरी कोमचा पराभव झाला तरीही तिचे हे आठवे पदक असणार आहे. यामुळे महिला आणि पुरुष वर्गामध्ये मेरी कोम सर्वात जास्त पदकांची मानकरी ठरली आहे. मेरीने क्युबाच्या पुरुष मुष्टियुद्धपटू फेलिक्स सेवॉन (1986-1999) यांना मागे टाकले असून जागतिक स्पर्धेत सर्वधिक पदकांची कमाई करणारी खेळाडू ती ठरली आहे.

जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सर्वाधिक पदके असणारे खेळाडू
1. मेरीकॉम (महिला) – 8 पदक (6 गोल्ड+1 सिल्वर +1 ब्रॉन्ज)
2. फेलिक्स सेवॉन (पुरुष), 7 पदक (6 गोल्ड+ 1 सिल्वर)
3. केटी टेलर (महिला) 6 पदक (5 गोल्ड+ 1 ब्रॉन्ज)

 दरम्यान, भारताच्या लवलीना बोरगोहेन हिनेदेखील 69 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. तिने मोरक्कोच्या बेल अहिबिबचा 5-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना बेलारूसच्या युलिया अपानासोविच हिच्या विरुद्ध होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.