‘शिवसेनाचा मुख्यमंत्री मिळू दे’; विठ्ठल-रुक्मिणीला अभिषेक

पेठ – निवडणूकीपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचं… आमचं ठरलंय… यानुसार निवडणुकीला सामोरे गेलेल्या युतीला मुख्यमंत्री पदाबाबत तडे गेलेले दिसत आहेत. कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना प्रमुख पक्षांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह दिसुन येत आहे.

पेठमध्ये आज कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून गावचे ग्रामदैवत श्री वाकेश्वर मंदीरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तीला अभिषेक घातला. यावेळी महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळू दे आणि महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होऊ दे, अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यात प्रामुख्याने शिवसेना आंबेगाव उपाध्यक्ष दिलीप पवळे, अशोक राक्षे, संपत शिंदे, शिवा पवळे, गणपत कराळे, मल्हारी ढमाले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.