मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ उल्लेख’; लेखकाचे नागरिकत्व रद्द 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी आंतरराष्ट्रीय मासिक टाइममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता’ असा लेख आतिश तासिर यांनी लिहिला होता. मात्र आता या लेखकाचे विशेष नागरिकत्व काढून घेण्यात आले आहे. यासंबंधाची माहिती गृहमंत्रालयाने ट्विटरद्वारे दिली आहे.

गृह मंत्रालयाने म्हटले कि, नागरिकत्व कायदा १९५५ नुसार आतिश तासिर यांनी ओव्हरसीज सीटीझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड ठेवण्यासाठी अयोग्य आहेत. त्यांनी यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुरवली नाहीत आणि काही माहितीही लपवली आहे. तसेच त्यांचे वडील मूळचे पाकिस्तानी असल्याची माहिती तासिर यांनी दिली नाही, असेही सांगण्यात आले आहे. यावर तासिर यांना स्पष्टीकरण देण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी या नोटिसीची दाखल घेतली नाही. यामुळे तासिर यांचे विशेष नागरिकत्व रद्द करण्यात येत असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले.

गृहमंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना आतिश तासिरने न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाचे स्क्रिनशॉट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले कि, हे बरोबर नाही. मला माहिती देण्यासाठी २१ दिवस नाहीतर केवळ २४ तसेच देण्यात आले होते. एवढेच नव्हेतर यासंबंधी मंत्रालयाकडून मला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असे तासिर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सरकारकडून सप्टेंबरमध्ये आतिश तासीर यांना नोटीस जारी केली होती. यामध्ये त्यांना २१ दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. मात्र तासीर यांना २० व्या दिवशी नोटीस मिळली आणि त्यांनी २४ तासात उत्तर दिले, वृत्त असे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. तसेच आतिश तासीर यांच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आणि अमेरिकन ग्रीन कार्ड देखील आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)