पारगाव- दौंड तालुक्यातील पारगाव येथे आठवड्यात बिबट्याचे नित्यदर्शन होऊ लागले आहे. पारगाव येथील लिप्ट वस्ती येथे नवनाथ बहिर यांच्या गोठ्यातील जर्सी जातीच्या 6 व 8 महिन्याच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. जनावरांच्या आवाजाने बहिर यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या निघून गेला.
यात दोन्ही कालवडी मृत पावल्या. वन क्षेत्रपाल एन. सी. चव्हाण यांनी पंचनामा केला आहे. दुसऱ्यादिवशी लिबाच्या झाडाखाली 2 बिबट्याचे दर्शन झाले. संजय ताकवणे यांच्या शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे पिल्लू दिसले. सिद्धार्थ ताकवणे व अशोक रूनवाल यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केला आहे.
बिबट्याचा वावर वाढला आहे. एक तसेच दोन किंवा तीन या संख्येने बिबटे दिसत आहेत. बिबट्याच्या पाऊलखुणा नित्याचाच झालेल्या आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.