जाणून घ्या…, लठ्ठपणावरील यशस्वी उपचार पद्धती

1. आहार पद्धती
भूक लागल्याशिवाय खाऊ नये हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही सेलिब्रेटी आहारतज्ज्ञांच्या क्‍लिप्स सोशलमीडिया इत्यादीवर व्हायरल झालेल्या दिसतात. आपला लठ्ठपणा (Obesity) आणि त्यामागे (दिसणारे आणि न दिसणारे) बिघडलेले आरोग्य यांचा कुठलाही विचार न करता अनेक जण अंधानुकरण करताना आढळतात. अन्नाचे सेवन करताना त्याचा वापर करताना तारतम्य बाळगायला हवे हे भान आपल्या समाजात दिसत नाही.

वजन, वय, शारीरिक क्षमता हार्मोन्स, जीवनसत्वाची पातळी, लिव्हर, किडनी थायरॉईड यांच्या क्षमता आणि विविध आजार यांचा विचार करून योग्य आहाराची आखणी केल्यास लठ्ठपणा(Obesity) काही प्रमाणात आटोक्‍यात येऊ शकतो. दुर्दैवाने आपण विचार न करता वाटेल ते आणि वाटेल तसे खातो. विविध पावडरी आणि विविध औषधे यांचा सुळसुळाट झालेला दिसतो. सर्व लोकांना एकसारखी आहारपद्धती लागू होऊ शकत नाही. हा मूलभूत सिद्धांत समजून न घेता दिलेल्या ट्रिटमेंट्‌स साहजिकच अपयशी होतात. योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय केल्या जाणाऱ्या आहार पद्धतींमुळे किडनीचे व हाडांचे विकार इत्यादी आढळून येतात.

2. औषधोपचार
लठ्ठपणा (Obesity)विरघळण्यासाठी कुठलीही जादूची गोळी अस्तित्वात नाही. हे सत्य समजून घेतले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने काही परिणामकारक औषधांवर कायमची बंदी घातली आहे याचे कारण म्हणजे त्यांचे जीवघेणे (अक्षरशः) दुष्पपरिणाम. अशा अतिशय कमी वेळात औषधाने बारीक होणाऱ्या, लठ्ठपणा (Obesity)विरघळणाऱ्या कुठल्याही औषधांच्या नादी लागणे निव्वळ आत्मघातकी ठरू शकते.

3. बेरीयाट्रिक सर्जरी
मेट्रॉबोलीझम मधील बरेचसे दोष हे पचन संस्थेद्वारे आटोक्‍यात आणता येतात. जठर आणि लहान आतडे यांच्या रचनेमध्ये काही विशिष्ट बदल केल्यानंतर लठ्ठपणा (Obesity)कमी होतो आणि त्याबरोबर आलेले आजार आटोक्‍यात येतात. दुर्बिणीतून केली जाणारी ही एक अतिशय सुरक्षित आणि शास्त्रीय उपचारपद्धती असून, लठ्ठपणा(Obesity) वर कायमची मात मिळविण्यासाठी याची खूप मदत होते. योग्य माहितीचा अभाव असल्यामुळे अनेक लोक हे अशास्त्रीय मार्गाचा अवलंब करताना दिसतात आणि त्याद्वारे स्वतःचा जीव धोक्‍यात घालतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.