प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक घटली असून कोथिंबीर, कांदापात, करडई, राजगिऱ्याच्या भावात वाढ झाली. मेथी आणि शेपूच्या भावात मात्र घट झाली आहे. तर चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळे आणि चुक्याचे भाव स्थिर आहेत.
पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. आवक घटल्याने भावात वाढ झाली असून रविवारी मार्केटयार्डात कोथींबीर 90 हजार आणि मेथीची 50 हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात जुडीमागे कोथींबीरीच्या भावात तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तर कांदापातीच्या भावात जुडीमागे दोन रुपये, करडई आणि राजगिरा प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली. तर मेथी आणि शेपुच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली.
पालेभाज्यांचे शेकड्याचे भाव
कोथिंबीर :1500-2500
मेथी :800-1000
शेपू : 600-800
कांदापात : 1000-1500
चाकवत : 600-800
करडई :500-700
पुदिना :200-800
अंबाडी :400-600
मुळे :1000-1500
राजगिरा :600-800
चुका :800-1000
चवळई :400-600
पालक :800-1200.