प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -दोन आठवड्यांपूर्वी पुण्यासह राज्यभरात जोरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादन आणि काढणीवर झाला. त्यामुळे जवळपास सर्वच भाज्या महागल्या होत्या. आता पंधरवड्यात पावसाने उघडीप घेतल्याने मागील आठवड्यात तुलनेत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे काही फळभाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. तर, आवकेपेक्षा तुलनेने मागणी वाढल्याने फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि गाजराच्या भावात वाढ झाली आहे. तर, अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमधून हिरव्या मिरचीची 10 ते 12 ट्रक, कर्नाटकातून कोबी 5 ते 6 ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटकमधून 3 ते 4 टेम्पो घेवडा, इंदौरहून 8 ते 9 टेम्पो गाजर, बेळगाव आणि धारवाडमधून 200 गोणी मटार मध्य प्रदेशातून लसणाची 15 ते 16 ट्रक इतकी आवक झाली. तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची 1400 ते 1500 पोती, भेंडीची 5 ते 6 टेम्पो, गवारची 5 ते 6 टेम्पो, टोमॅटोची 13 ते 14 हजार कॅरेट, फ्लॉवरची 8 ते 10 टेम्पो, कोबीची 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरचीची 10 ते 12 टेम्पो, भुईमूग शेंगाची 100 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांद्याची 50 ते 60 ट्रक, बटाटा आंध्र प्रदेश आणि इंदूर येथून 40 ते 45 ट्रक बटाटा इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा100-140
बटाटा170-210
लसूण100-400
आले सातारी100-400
भेंडी300-500
गवार :
गावरान व सुरती500-800
टोमॅटो100-150
दोडका400-500
हिरवी मिरची300-400
दुधी भोपळा200-250
चवळी300-350
काकडी160-220
कारली :
हिरवी400-450
पांढरी400-450
पापडी500-550
पडवळ300-350
काकडी160-220
फ्लॉवर160-220
कोबी240-260
डिंगरी250-300
नवलकोल140-150
ढोबळी मिरची500-550
तोंडली :
कळी400-450
जाड200-220
शेवगा350-500
गाजर350-380
वालवर550-600
बीट100-120
घेवडा500-600
कोहळा100-150
आर्वी250-300
घोसावळे300-350
ढेमसे300-350
भुईमूग शेंग400-450
मटार :
स्थानिक1100-1200
परराज्य1100
पावटा300-350
तांबडा भोपळा60-100
सुरण180-200
मका कणीस50-80
नारळ (शेकडा)1000-1600.