पिंपरी – आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चार वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. दोन दिवसांत शहरातील चार ठिकाणांहून दुचाकी पळवून नेल्याची घटना उजेडात आल्या आहेत.
मोरवाडी येथी नाज बेकरीजवळ लावलेली 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 14 /एम एल 3142) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी कृष्णा बसराज कोलोळु (वय 30) यांनी फिर्यादी दिली. सनी समशेरसिंग डोकवाल (वय 29, रा. दत्तनगर, दिघी) यांनी भोसरी पोलिसांत दुचाकीचोरीची फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची रामनगर बोपखेल येथील म्हशीच्या गोठ्याजवळ शुक्रवारी (दि.30) पार्क करून ठेवली होती.
अज्ञात चोरटयांनी सनी यांची दुचाकी चोरून नेली. तसेच तळेगाव दाभाडे येथील ट्रेडर्स दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 31) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सतीश शशिकांत खोडे (वय 37, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली. तर तळेगाव दाभाडे येथे मामासाहेब खांडगे आर्केड बसडेपो जवळ पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गणेश आत्माराम वाडेकर (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.