उत्साह आणि जल्लोषाची क्षणचित्रे

पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे जगभरातील भाविकांच्या आकर्षणाचा विषय. हा वैभवशाली उत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दरवर्षी पुण्यात येतात. आपण कितीही आधुनिकतेकडे वाटचाल करत असलो, तरी गणपती बाप्पांप्रती असलेल्या श्रद्धेमुळे या उत्सवाची लोकप्रियता वर्षानुवर्षे वाढत आहे. दरसालाप्रमाणे यंदाही गणेश आगमनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, ध्वजवंदन आणि नगारावादनाने केले. तर, बाप्पांच्या आगमनात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी मंडळांचे कार्यकर्तेदेखील तितक्‍याच उत्साहाने हे वादन करत होते. मग त्यात शंख, चौघडा वादनदेखील आले. त्याचा आनंद घेणे, हीदेखील एक पर्वणीच असते. त्याची काही क्षणचित्रे “प्रभात’च्या वाचकांसाठी…

Leave A Reply

Your email address will not be published.