पुसेगाव – जावयाकरिता धोंड्याचे गोडधोड जेवण खाऊ घालण्यासाठी सासुरवाडीकरांची सध्या लगबग सुरू आहे. तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मास महिन्यात जावयाचा मानपान करतात. सगळीकडेच जावयांच्या धोंडयाच्या जेवणाची धामधूम असते. जावयांना जेवू घालण्याची प्रथा आहे.
जावयाला घरी बोलावून गोडधोड जेवण देऊन सोन्याची अंगठी किंवा किमती वस्तू भेट देतात. लेकीचेही माहेरची मंडळी आदरातिथ्य करतात. अधिक महिन्याला “धोंड्याचा महिना’च संबोधतात. ग्रामीण भागात तर आज सुद्धा धोंडा जेवण म्हटले तर संपूर्ण पाहुणे मंडळी येतात आणि त्या सर्वांना कपडे करतात. सर्वसाधारणपणे भारतीय दिनदर्शिका चंद्र महिन्यावर आधारीत आहे. यापैकी ज्या महिन्यात सूर्याची संक्रांती नसते. त्या महि असे म्हणतात. यावेळी श्रावणात अधिक महिना पडला आहे आणि त्यामुळेच यावेळी श्रावण दोन महिने आहे. एका सौर वर्षात 365 दिवस आणि 6 तास असतात. तर चंद्र महिन्यात 354 दिवस आणि 9 तास असतात.
हिंदू दिनदर्शिकेमध्ये 11 दिवस कमी आहेत. हे दिवस जोडून दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. धार्मिक परंपरेनुसार अधिक मासामध्ये ध्यान, जप, तपस्या, धार्मिक विधी करणे फलदायी असते. धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील सर्व सजीवांची निर्मिती पाच तत्वांनी बनलेली आहे. या पाच तत्वांमध्ये जल, अग्री, आकाश, वायू आणि पृथ्वी यांचा समावेश होतो. या महिन्यात प्रत्येक जीव आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्यांनी आपला शारीरीक आणि आध्यात्मिक विकास साधतो. सध्या कपडे, सोने, किराणा साहित्य व इतर खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. परंतु, सरकारने महिलांसाठी बसमध्ये अर्धे तिकिट केल्यामुळे व 65 वर्षाच्या पुढील फ्रीमध्ये केल्यामुळे नागरिक खासगी वाहनांकडे पाठ फिरवत असल्याच दिसून येत आहे. यामुळे खासगी वाहनधारकांना धोंडयाच्या महिन्यात देखील उपासमारीची वेळ आली आहे.