#IPL2019 : बंगळुरूला आज विजय अनिवार्य; कोलकाताला रोखण्यास रणनीतीची गरज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. चिन्नस्वामी स्टेडियम, बंगळुरू

बंगळुरू  -आयपीएलच्या बाराव्या सत्रात एकही सामना जिंकू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज कोलकाता नाईट रायडर्सचे तगडे आव्हान असून आयपीएलमधील आपले आव्हान कायम राखण्यासाठी बंगळुरूच्या संघाला आज विजय अनिवार्य आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात फलंदाजांच्या बाबतीत सर्वात तगडी टीम समजल्या जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला आपल्या चारही सामन्यात पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. यावेळी पार्थिव पटेल वगळता इतर एकाही फलंदाजाला अपेक्षित कामगिरी करण्यात यश आले नसल्याने त्यांच्या संघाला आतापर्यंत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच त्यांच्या संघाकडे ए.बी. डीव्हिलियर्स, मोइन अली, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, हेन्‍रीच क्‍लासिन, शेमरॉन हेटमायर सारखे तगडे फलंदाज असतानाही त्यांची अशी अवस्था होणे हे संघासाठी धोक्‍याची घंटा वाजवणारे आहे.

त्यातच विराट कोहली आणि ए.बी. डीव्हिलियर्सने मुंबई विरुद्धच्या सामन्यत चांगली कामगिरी करत पुन्हा लयीत आल्याचे दाखवून दिले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांना अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आले आहे. यावेळी वेस्ट इंडिजचा खेळाडू शेमरॉन हेटमायरला मधल्या फळीतील जबाबदारी हाताळण्यात अपयश आले असून त्याला एकाही सामन्यात दुहेरी धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्‍यता कमी असून त्याच्या जगी हेन्‍रीच क्‍लासिनला संघात स्थान दिले जाऊ शकते.

तर, दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिल्या सामन्यापासून आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागल्यामुळे स्पर्धेत त्यांना 3 सामन्यात 2 विजय आणि एक पराभव अशा कामगिरीने गुणतालिकेत त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांच्या संघाकडून पहिल्या सामन्यापासून त्यांचे सलामीवीर ख्रिस लीन, सुनील नारायण, तसेच मधल्या फळीतील नितेश राणा, दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी चांगल्या कामगिरीने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला असून गोलंदाजांमध्ये पियुष चावला, कुलदिप यादव यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जर बंगळुरूला आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, नितेश राणा, रिंकू सिंह, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.