कोल्हापूर – मुलाचा थंड डोक्याने खून करुन पत्नी आणि सासूला नरबळीच्या गुन्ह्यात अडकवण्याचा बनाव रचणाऱ्या बापाला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलाचा खून नरबळी नसून पत्नीच्या अनैतिक संबधातून व जन्माला आलेला मुलगा दुसऱ्याचा असल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली बापाने पोलिस तपासात दिली.
शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातून आरव राकेश केसरे हा पाच वर्षाचा मुलगा 3 ऑक्टोबर रोजी राहत्या घरातून गायब झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह घरासमोरील पडक्या घरात 5 ऑक्टोबर रोजी सापडला. त्याच्या अंगावर कुंकु, गुलाल, लिंबू असल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्हाचा छडा लावत बापाला अटक केली. राकेश केसरे यांनी मुलाचा खून केल्याची कबुली दिली.