कोल्हापूर : बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला.
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि डॉक्टर डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे महिलांनी नेसलेल्या आकर्षक नऊवारी साड्या लक्ष वेधणाऱ्या होत्या तर सामाजिक संदेश देणारे फलकही वेगळेपण दर्शवत होते.
कोल्हापूरात प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “चला सख्यांनो वारसा संस्कृतीचा जपूया आणि ताकद स्त्री शक्तीची दाखवूया’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन सिनेअभिनेत्री रविना टंडन यांच्या हस्ते व महिला बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या कस्तुरी सावेकर, अर्पिता शेलार, शिवानी पाटील, राधीका कालेकर, निरीजा सुठ, अनुजा सुठ, वैशाली सुठ या महिलांचा विशेष सन्मान रविना टंडनच्या हस्ते करण्यात आला आहे.