नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकताना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांची बरसात करून क्रमवारीतील स्थान सुधारले. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत कोहली 928 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. स्मिथ 923 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत स्मिथला अपयशाचा सामना करावा लागला. ब्रिस्बेन कसोटीत स्मिथने केवळ 4 धावा केल्या. तर, एडिलेड कसोटीत त्याने 36 धावा केल्या. त्याचवेळी कोलकाता येथे झालेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत कोहलीने शतक फटकावले.
आयपीएल लिलावात नवोदितांवर लक्ष इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2020 च्या स्पर्धेसाठी जवळपास 971 खेळाडूंचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला कोलकत्यात होणार आहे. यंदाच्या लिलावात विजय हजारे आणि सैयद मुश्ताक अली स्पर्धेत सरस कामगिरी करणारे यशस्वी जायस्वाल, प्रीयम गर्ग, इशान पोरेल व विराटसिंग यांच्यावर सर्वाधिक रकमेची बोली लागणार असे संकेत आहेत. स्पर्धेतील आठही संघांनी काही खेळाडूंना रिटेन व रिलीज केले आहे. एकूण 971 खेळाडू लिलावासाठी फ्लोअरवर असतील. त्यातून 73 खेळाडूंची निवड करण्यात येईल.