तमन्नाची पावले वेबसीरीजकडे…

सध्या इंटरनेटवरील वेबसीरीजमुळे अनेक कलाकारांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नवोदित कलाकारांबरोबरच जुने, रुपेरी पडद्यापासून दूर गेलेले किंवा दूर फेकले गेलेले कलाकारही या नवमाध्यमातून पुनरागमन करत आहेत. सध्या नेहमी लाईमलाईटमध्ये असणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाही आता या मार्गाने जाणार आहे.

लवकरच ती एका वेबसीरीजमध्ये झळकणार असून त्या माध्यमातून ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. “द नवंबर स्टोरी’ नामक ही वेबसीरिज महिलाकेंद्री आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन राम सुब्रह्मण्यम करत आहेत. हॉटस्टारवर स्ट्रीम होणाऱ्या या वेबसीरीजमध्ये तमन्नाने एका मुलीची व्यक्‍तिरेखा साकारली आहे.

ही मुलगी स्वतःच्या वडिलांना त्यांची इमेज गुन्हेगार अशी बनण्यापासून वाचवण्यासाठी धडपडत आहे. यामध्ये वडिलांच्या भूमिकेत जीएम कुमार दिसणार आहेत. तमन्ना सांगते की, एक कलाकार म्हणून माझ्यातील अभिनयक्षमता दाखवण्यासाठी वेबसीरीजचे व्यासपीठ खूप प्रभावी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.