अजयसारखं बनायचंय!

बॉलीवूडच्या दुनियेतील प्रत्येकाचाच कुणीतरी आयडॉल किंवा आदर्श असतो. दीर्घकाळापर्यंत ते आदर्श तसेच राहतात किंवा कालोघात आपल्या भवतालच्या व्यक्‍तींचं निरीक्षण केल्यावर त्यातील एखादी व्यक्‍ती आपल्याला कमालीची प्रभावित करुन जाते. हा प्रभाव इतका असतो की आपल्याला त्याच्यासारखंच बनावंसं वाटतं.

मलायिका आरोरासोबतच्या अफेअरमुळे आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असणाऱ्या अर्जुन कपूरच्या बाबतीत नेमेके हेच झाले आहे. अर्जुन सध्या पानिपत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी बातचीत केली असता त्याने आपल्याला अजय देवगण यांच्यासारखे बनायचे आहे, अशी भावना व्यक्‍त केली.

 

याचे कारण विचारले असता अर्जुन म्हणतो की, पहा ना, अजय देवगण चित्रपटाचे दिग्दर्शनही करतात, निर्मितीही करतात आणि त्याच वेळी त्यांच्यामध्ये उत्तम अभिनेत्याचेही गुण आहेत. तसेच त्यांची व्हीएफएक्‍स कंपनीही आहे. हे सारं काही त्यांनी आपल्या कारकिर्दीतील चढउतारांचा सामना करत-करत केले आहे. अर्जुन पुढे म्हणतो की, अपयश असो वा यश हा आयुष्याचा एक भाग असतो.

दोन्हीही परिस्थितीत तुम्ही स्वतः कसे राहता, परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जाता यावर बरेच काही अवलंबून असते. त्यातून तुम्ही स्टार म्हणून, कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून कसेआहात हेही लोकांना कळून चुकतं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)