IPL 2024 KKR vs RR : आज आयपीएल 2024 चा 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाल्याचे संजू सॅमसनने सांगितले. त्याचबरोबर या सामन्यात कोलकाता कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.
KKR vs RR Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक /कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
दरम्यान, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दोन्ही संघ 10 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी सहा सामने केकेआरने तर तीन सामने आरआरने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 14 सामने जिंकले असून राजस्थानने 13 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. म्हणजेच आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. या सामन्यातही चाहत्यांची तशीच अपेक्षा असेल.