Aditya Srivastava UPSC 2023 Topper : युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2023 चा निकाल जाहीर झाला आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये लखनऊचा आदित्य श्रीवास्तवने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनिमेष प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे. या परीक्षांमध्ये एकूण 180 उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) साठी निवड झाली आहे.
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. दरम्यान, प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या आदित्यने आपले शिक्षण कोठून पूर्ण केले आणि किती प्रयत्नांत त्याने UPSC उत्तीर्ण केले याबद्दल जाणून घेऊयात…. । Aditya Srivastava । UPSC 2023 Topper
आदित्यने आपले सुरुवातीचे शिक्षण सीएमएस अलीगंज, लखनऊ येथून पूर्ण केले. यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक आणि एमटेक केले. त्याने बेंगळुरू येथे एका अमेरिकन MNC कंपनीत 15 महिने काम केले.
त्यानंतर त्याने 2020 मध्ये नोकरी सोडली आणि UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याला UPSC 2022 मध्ये 236 वा क्रमांक मिळाला आणि त्याची IPS साठी निवड झाली.
IPS मधून IAS झाले- । Aditya Srivastava UPSC 2023 Topper
आदित्य श्रीवास्तव सध्या पश्चिम बंगालमध्ये अंडर ट्रेनिंग आयपीएस म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील अजय श्रीवास्तव हे केंद्रीय लेखापरीक्षण विभागात AAO म्हणून कार्यरत आहेत. तर त्याची धाकटी बहीण नवी दिल्लीतून नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे. आदित्यची आई आभा श्रीवास्तव सामान्य गृहिणी आहे.
तयारी कशी केली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने हे यश कोचिंगशिवाय मिळवले. त्याने चाचणी मालिका आणि मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तयारी केली. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा पर्यायी विषय निवडला आहे. त्याच्या शाखेत त्याने बी.टेकही केले होते.
त्यांनी मागील वर्षाच्या पेपर्सचा अभ्यास केला आणि त्यानुसार प्रिलिम्स आणि मुख्य दोन्ही परीक्षांची तयारी केली. तयारीसाठी त्यांनी अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार केल्या. दुसऱ्या प्रयत्नात त्याने यूपीएससी उत्तीर्ण केली. । Aditya Srivastava UPSC 2023 Topper