BAN vs NZ 2nd Test Innings Report : ढाका कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव 180 धावांवर आटोपला. अशा प्रकारे किवी संघाला पहिल्या डावाच्या आधारे 8 धावांची आघाडी मिळाली. बांगलादेशने पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 72 चेंडूत 87 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. पण ग्लेन फिलिप्सशिवाय एकाही किवी फलंदाजाला पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे संपूर्ण संघ अवघ्या 180 धावांत ऑलआऊट झाला.
बांगलादेशी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी पत्कारली शरणागती…
सलामीवीर टॉम लॅथमने 4 धावा केल्या. त्याचवेळी ड्वेन कॉनवेही 11 धावा करून माघारी परतला. केन विल्यमसनलाही विशेष काही करता आले नाही. केन विल्यमसन 13 धावा करून मेहंदी हसन मिराझचा बळी ठरला. यानंतर हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल अनुक्रमे 1, 10 आणि 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. ग्लेन फिलिप्सने नक्कीच 87 धावांची खेळी खेळली, पण बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. मिचेल सँटनर, कायली जेम्सन आणि टिम साउथी यांनी अनुक्रमे 1, 20 आणि 14 धावांचे योगदान दिले.
बांगलादेशची गोलंदाजी…
बांगलादेशच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मेहंदी हसन मिराज आणि तेजुअल इस्लाम हे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. मेहंदी हसन मिराज आणि तेजुअल इस्लाम यांना प्रत्येकी 3 यश मिळाले. नईम होसेन आणि शोरीफुल इस्लामने 2-2 किवी फलंदाजांना आपले बळी बनवले.
A slender lead for New Zealand as Bangladesh return the favour and bowl them out for a low total.#WTC25 | #BANvNZ | 📝: https://t.co/7jGR95KBan pic.twitter.com/K8dT4QwBMd
— ICC (@ICC) December 8, 2023
दरम्यान, बांगलादेशचा पहिला डाव 172 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 35 धावा केल्या. शहादत होसेनने 31 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने 3-3 बळी घेतले. एजाज पटेल याला 2 विकेट घेण्यात यश मिळाले तर टीम साउथने 1 विकेट घेतली.