मुंबई – ‘खबरदार’ चित्रपटातील अभिनेत्री किशोरी गोडबोलेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात किशोरी तिच्या मुलीसोबत दिसत आहे. नवरात्रीनिमित्त या मायलेकींनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात दोघी गरबा खेळताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
किशोरी गोडबोले आणि लेक सई यांनी घागरा चोली परिधान करत पारंपारिक लुकमध्ये गरबाच्याचा व्हिडिओ शूट केला आहे. ‘झुमेरे रे गोरी’ या गाण्यावर त्या गरबा करताना दिसत आहे. लेकीसोबत किशोरी गोडबोले यांनीही दमदार डान्स करत चाहत्यांचं मन जिंकले आहे. ‘मदर-डॉटर’ डान्स रील असं तिने कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडिओवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांची देखील पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी किशोरी गोडबोलेंचं कौतुक केलं आहे. ‘क्या बात है.. किशोरी तू कमाल आहेस, असं वाटतंय तुझी मुलगी आरशासमोरच डान्स करत आहे’ अशी खास कमेंट सुप्रिया यांनी केली आहे. तर स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, पूजा सावंत, ऋतुजा देशमुख या कलाकारांनीही व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. सध्या या मायलेकींचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. या मायलेकींना पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत.