मालदीव – मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर. या जोडीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाले आहेत. मात्र आजही या दोघांचे नाते अतूट आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या ही जोडी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
मालदीवमध्ये सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची लेक श्रिया देखील सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील त्यांचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील एका व्हिडिओमध्ये सचिन आणि सुप्रिया सुंदर निळसर समुद्रकिनाऱ्यावर बसल्याचे दिसत आहे. यावेळी ‘सागर किनारे..दिल ये पुकारे..’ हे गाणं दोघंही गुणगुणत आहेत. त्यांचा रोमॅंटिक अंदाज सध्या चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
View this post on Instagram
त्यांचा हा सुंदर व्हिडीओ त्यांची लेक श्रिया हिने शूट केला आहे. सध्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांचा लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. ‘लव्हली जोडी’, ‘खूप सुंदर’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहे.