bollywood – बिगर फिल्मी पार्श्वभूमीतून आलेले असूनही, राजकुमार रावने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘स्त्री’चा विकी असो की ‘काय पो छे’चा गोविंद… राजकुमार रावने प्रत्येक पात्र एवढ्या उत्कृष्टपणे साकारले आहे की विसरणे कठीण आहे.
अभिनेता राजकुमार राव हा बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचाही चाहता आहे. राजकुमार राव अनेकदा शाहरुख खानबद्दल बोलताना दिसतो. अलीकडेच राजकुमारने त्याच्या आवडत्या शाहरुख खानबद्दल खुलासा केला आहे. मुलाखतीदरम्यान राजकुमारने सांगितले की, त्याला किंग खानकडून कोणती खास गोष्ट चोरायची आहे.
बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानची लोकप्रियता सातासमुद्रापार आहे. मात्र, केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूडचे अनेक स्टार्सही आहे, जे किंग खानला आपला आदर्श मानतात. या यादीत राजकुमार रावच्या नावाचाही समावेश आहे. पण जाणून घ्या शाहरुख खानची अशी कोणती खास गोष्ट आहे, जी राजकुमार रावला अनेक वर्षांपासून आवडते.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावला विचारण्यात आले की, त्याला शाहरुख खान, सलमान खान, विजय वर्मा आणि अभिषेक बच्चन यांच्याकडून कोणती गोष्ट चोरायची आहे. त्यामुळे राजकुमार रावचे उत्तर ऐकून चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला. राजकुमाराने मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्याला शाहरुख खानला विचारायचे आहे की, ‘छैय्या छैय्या’ मधले लाल जॅकेट कुठे ठेवले आहे?’ या गाण्यातील जॅकेट राजककुमारला हवे आहे, ‘दिल से’ चित्रपटात शाहरुख खानने चालत्या ट्रेनमध्ये ‘छैया-छैया’ गाण्यावर डान्स केला. या गाण्यातील जॅकेटवर राजकुमारची अनेक वर्षांपासून नजर होती.
सलमान खान आणि अभिषेकला या गोष्टी आवडतात
रणवीर सिंगची कोणती खास गोष्ट अभिनेताला चोरायची आहे यावर राजकुमार रावने सांगितले की,’तो त्याचे सामान तर अभिषेक बच्चनचे शू कलेक्शन अप्रतिम आहे, तर त्याला सलमान खानचे डेनिम कलेक्शन देखील आवडते.’ असेही राजकुमारने सांगितले आहे.