नवी दिल्ली – नवरात्रोत्सवाच्या (Navratr) सहाव्या दिवशी एका दुख:द घटनेत कपडवंज खेडा (गुजरात) येथे गरबा (Garaba) खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कपडवंज येथील गरबा मैदानावर 17 वर्षांचा मुलगा (17 year old boy heartatack) अचानक चक्कर येऊन पडला. त्याच्यावर तेथे उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला पण तो प्रतिसाद देत नव्हता.
घटनास्थळी असलेल्या स्वयंसेवकांनी तात्काळ त्याच्यावर कार्डिओ-रेस्पीरेटरी उपचार केले पण तो कोणताच प्रतिसाद देत नव्हता आणि त्याची नाडीपण लागत नव्हती. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले परंतु रूग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे त्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वीर शहा (Veer shah) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आईवडिल याच गावातील दुसऱ्या मैदानावर गरबा खेळत होते.
या मुलाचे वडिल रिपल शाह, यांनी रडवेल्या चेहेऱ्याने अन्य लोकांना आवाहन करताना म्हटले आहे की, गरबा खेळताना सावधगिरी बाळगा, विश्रांती घेतल्याशिवाय खेळत राहू नका. आज मी माझे मूल गमावले आहे आणि अशी घटना इतर कोणावरही घडू नये अशी इच्छा आहे.