सातारा – किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या कारखाना बचाव पँनेलने आघाडी घेतली आहे.
वाई औद्योगिक वसाहतीत आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. संस्था मतदारसंघातून पहिल्या फेरीत आमदार मकरंद पाटील यांना 113 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी रतन शिंदे यांना 58 मिळाली.
अनुसूचित जाती जमाती गट, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग या मतदारसंघातूनही आमदार मकरंद पाटील पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. विरोधी सत्ताधारी मदन भोसले यांचे पँनेल पिछाडीवर आहे. अंतिम निकाल रात्री उशिरा शिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.