मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती प्रत्येक वेळी तिच्या व्यक्तिरेखेने सर्वांना आश्चर्यचकित करते. आलियाचा नुकताच गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. दरम्यान बॉलिवूडमध्ये धमाल केल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये थैमान घालण्यासाठी सज्ज झाली आहे.
आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री गल गॅडोत सोबत काम करणार आहे. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. हार्ट ऑफ स्टोन असे या चित्रपटाचे नाव आहे. ज्याचे दिग्दर्शन टॉम हार्परने केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून आलिया नुकतीच ब्रिटनला रवाना झाली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आलिया भट्टच्या हॉलिवूड पदार्पणाची माहिती दिली आहे. नेटफ्लिक्स वर येणाऱ्या हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटामध्ये आलिया भट्ट गल गॅडोतसोबत दिसणार आहे. अभिनेत्री जागतिक स्तरावर पदार्पण करणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाचे टॉम हार्पर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट Greg Rucka आणि Allison Schroeder यांनी लिहिला आहे.