पौड पोलिसांनी वाचवले युवकाचे प्राण

नियंत्रण कक्षाला कळवून आत्महत्येचा प्रयत्न ः पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला

पिरंगुट-“मी प्रवीण पवार… रा. स्क्वेअर मेमरीज इमारत, माताळवाडी फाटा, भूगाव, ता. मुळशी… मी माझ्या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करीत आहे’ ही माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. नियंत्रण कक्षाकडून ही माहिती पौड पोलिसांना मिळते. वेळीच पौड पोलीस घटनास्थळी दाखल होतात आणि या युवकाचे प्राण वाचवितात.

याबाबत पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले की, प्रवीण पवार याने आत्महत्या करीत माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने तात्काळ पौड पोलिसांना ही माहिती दिली. ठाणे अंमलदार कांबळे यांनी माहिती मिळताच बिट अंमलदार एस. राक्षे यांना कळविले. एस. राक्षे व होमगार्ड भरत शेडगे हे याठिकाणी आले. येथे चौकशी केली असता, प्रवीण पवार नावाची व्यक्ती येथे राहत नसल्याचे लोकांनी सांगितले.

पोलिसांनी शेजारील प्लॅटमध्ये चौकशीसाठी दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता समोरच सोफ्यावर पवारने आपल्या डाव्या हाताची मनगटाची नस कापलेली दिसली. पोलिसांनी हातावर रुमाल बांधून त्याला तात्काळ जमलेल्या लोकांचे मदतीने समोरच असलेल्या युनिक हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.

योग्यवेळी उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हॉस्पिटलचे डॉक्‍टर यांनी सांगितले आहे. कऱ्हाड (जि. सातारा) येथील असल्याचे समजले असे असून त्याचे आई-वडिलांना संपर्क साधून माहिती दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)