संभाजी ब्रिगेडचे कोकाटे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

बारामतीत घेतली शरद पवारांची भेट

बारामती – संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे देखील बदलत आहे. श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या भेटीप्रसंगी कोकाटे यांच्या समवेत प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेटही अशीच प्रवीण गायकवाड, किरण गुजर, प्रफुल्ल तावरे आदींनी शरद पवार यांच्याशी घडवून आणली होती. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि डॉ. कोल्हे यांना थेट राष्ट्रवादीने खासदारकीची संधी दिली.

राष्ट्रवादीमधून आउटगोईंग सुरु असताना अमोल मिटकरी व अमोल कोल्हे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रचारादरम्यानच्या भाषणांना मिळालेल्या प्रतिसादाचा फायदा राष्ट्रवादीला थेट झाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.