Khalistani terrorists : आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यपूर्वेतील इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन (Israel – Palestine Attack ) यांच्यातील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी शनिवारी गाझा पट्टीवर हल्ला करत फक्त २ मिनिटात इस्रायलवर 5000 रॉकेट डागले असल्याची माहिती समोर आली होती. याच हल्ल्याचा आधार घेत आता खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू (Khalistani terrorists)याने चक्क आता त्याने थेट पंजबच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिली आहे. भारत सरकार आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकावत पन्नू म्हणाला की, “पंजाब वर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू ” अशी थेट धमकीच दिली आहे.
पन्नूने भारत सरकार आणि सीएम मान यांना धमकी देत इस्रायलमधील हमास हल्ल्यापासून धडा घ्यायला सांगितला. खलिस्तानी दहशतवाद्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून ही धमकी दिली आहे. हा ४० सेकंदांचा व्हिडीओ आहे ज्यामध्ये पन्नू भारताविरुद्ध विष ओकताना दिसत आहे. तो म्हणाला की, “आम्ही पंजाबला भारताचा भाग मानत नाही आणि तो स्वतंत्र करु.” असा इशारा देखील त्याने दिला आहे.
दरम्यान, कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध मागील काही काळापासून तणावपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहेत. खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorists) हरविंदर सिंग निज्जर याची हत्या झाल्यानंतर हे प्रकणी पुन्हा एकदा पुढे आले आहे.