India vs Afghanistan World Cup 2023 :- भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातील आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज (11 ऑक्टोबर ,बुधवार) होणार आहे. विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाच्या नजरा असतील.
पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचवेळी अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानचा संघ भारतीय भूमीवर प्रथमच टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू झाला आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल हा अफगाणिस्तानच्या बाजूनं लागला आहे. (Afghanistan won the toss and elected to bat) कर्णधार हशमतुल्लाह शहीदी याने Toss जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहितनं भारतीय संघात अश्विनच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली आहे.
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे :-
भारत :- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान :- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
दरम्यान, 14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यापूर्वी भारताला हा सामना जिंकायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाला विजयी मार्गावर परतायचे आहे. भारतानंतर 15 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंडशी त्याचा सामना होणार आहे.