India vs Afghanistan World Cup 2023 :- भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातील आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आज (11 ऑक्टोबर ,बुधवार) होणार आहे. विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाच्या नजरा असतील.
पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचवेळी अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानचा संघ भारतीय भूमीवर प्रथमच टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल हा अफगाणिस्तानच्या बाजूनं लागला आहे. (Afghanistan won the toss and elected to bat) कर्णधार हशमतुल्लाह शहीदी याने Toss जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, 14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यापूर्वी भारताला हा सामना जिंकायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाला विजयी मार्गावर परतायचे आहे. भारतानंतर 15 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंडशी त्याचा सामना होणार आहे.