मुंबई – साऊथ स्टार कीर्ती सुरेश नुकतीच दसरा या चित्रपटात दिसली. अशात काही दिवसांपासून ती तिच्या लग्नाबद्दल चर्चेत आहे. ती दुबईतील एका बिझनेसमनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. आता या सगळ्यावर कीर्ती सुरेशने मौन तोडले आहे. या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही आणि गरज पडल्यास ती नक्कीच तिच्या मिस्ट्री मॅनचा खुलासा करेल असे कीर्तीने म्हटले आहे.
कीर्ती सुरेशचा फरहान नावाच्या व्यक्तीसोबतचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होतोय. कीर्ती या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या चर्चांमुळे कीर्तीच्या चाहत्यांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची चांगलीच उत्सुकता लागली. ज्याबाबत किर्तीने आता खुलासा केला आहे.
आता अफवांचा बाजार तापताच कीर्ती सुरेशने हे गुपित उघड केले आहे. त्याने ट्विटर पोस्टमध्ये लिहिले, ‘हाहाहा!! या वेळी माझा खास मित्र या सगळ्यात ओढायचा नव्हता! जेव्हा जेव्हा मला करावे लागेल तेव्हा मी खरा गूढ माणूस सर्वांसमोर आणेन. तोपर्यंत थंडीची गोळी. मग मी म्हणेन की ते योग्य नव्हते.’असं म्हणत तिने या अफवांवर पूर्ण विराम लावला आहे.