मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळीने अप्रतिम अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्राजक्ता सोशलवर देखील प्रचंड सक्रिय असते. अनेकदा प्राजक्ता तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावरून तिला ट्रोल केले जात आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली आहे. या फोटोला तिने “हुस्न-ओ-इश्क़ के दम से ज़माना, यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना..” असे हटके कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. काहींना प्राजक्ताचे फोटो आवडले आहेत. तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.
या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेन्ट करत लिहिले की, ‘काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे?, ‘लाज, लज्जा, अब्रूची काही किंमत नसलेली व्यक्ती..’ तर आणखी एकाने ‘असे फोटो नका टाकू. बाकी लोकांमध्ये आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फरक राहू द्या,’ असे म्हंटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्राजक्ता याआधी ‘रान बाजार’ या मराठी वेब सिरीजमध्ये दिसली होती. यासोबतच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये सूत्रसंचालन करताना देखील दिसून येते.