Entertainment – बॉलीवुड अभिनेता वरुण धवन पर्सनल लाइफ आणि चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. वरून धवन आपल्या करियरच्या रोमांचक वेळेतून जात आहे. चित्रपट निवडतांना सुद्धा तो काही मनोरंजक चित्रपटच निवडतो आहे. लवकरच वरून धवन त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. वरूनचा येणारा ‘वीडी 18’ चित्रपट जवान निर्देशक एटलीचा असणार आहे. या चित्रपटात वरून सोबत साउथ अभिनेत्री कीर्ति सुरेश दिसणार आहे. Varun Dhawan , autorickshaw ride, Keerthy Suresh, watch video , Entertainment, Bollywood News
बॉलीवुडला कीर्ति सुरेश आणि वरुण धवन ही नवी जोडी मिळणार आहे. या जोडीने चित्रपट १८ दिन चे शुटिंग पूर्ण केलं आहे. मुंबई या दोघांना कित्येकदा एकत्र बघितल्या गेले, अशात वरूनने कीर्ती सुरेश सोबत ऑटोरिक्शाने प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.
कीर्ती सुरेश फिकट निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या ट्रेगिंगसह काळ्या स्नीकर्समध्ये दिसली. तिने क्रॉसबॉडी बॅगने तिचा लूक पूर्ण केला. यादरम्यान दोन्ही स्टार्स ऑटोमध्ये बोलताना दिसले. पापाराझींना पाहून दोघेही हलकेच हसले.
रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन ‘VD 18’ मध्ये एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. या लूकमध्ये तो यापूर्वी कधीही दिसला नव्हता. तर कीर्ती या चित्रपटात लेखिकेची भूमिका साकारत आहे. मुराद खेतानी यांच्या सहकार्याने अॅटली या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाशी संबंधित उर्वरित कलाकारांबाबत सध्या कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. Varun Dhawan , autorickshaw ride, Keerthy Suresh, watch video , Entertainment, Bollywood News