मुंबई – प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते ‘केदार शिंदे’ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपले मत एकदम परखड पणे मांडत असतात. त्यामुळेच का होईना केदार शिंदे सतत माध्यमंध्ये चर्चेत असतात. नुकतंच केदार शिंदेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची घोषणा आणि अचानक उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावर केदार शिंदे यांनी ही पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अण्णा जेवायला जेवायला असं म्हणत ‘सही’ आणि ‘उपोषण’ असे दोन हॅशटॅग वापरत टोला लगावला आहे. केदार शिंदे राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांचे ट्वीट्स कायमच चर्चेत राहतात.
अण्णा जेवायला जेवायला….. #सही #उपोषण
— Kedar Shinde (@mekedarshinde) February 13, 2022