मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच अक्षय कुमारसोबत “सूर्यवंशी’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या कतरिना व्यस्त आहे.
याच दरम्यान कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कतरिना ही आपल्या बहिणीसोबत घराच्या टेरेसवर काही पोज देताना दिसत आहे. यात दोघीही खूपच स्टायलिश असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
याप्रसंगी कतरिना नीयन ग्रीन टॉप आणि जीन्समध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे. दुसरीकडे तिची बहीण इसाबेल ब्ल्यू क्रॉप टॉप आणि व्हाइट पॅन्टमध्ये झळकत आहे. हा फोटो शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “साइड वाला स्वॅग’. “सूर्यवंशी’ची प्रतीक्षा आहे.
5 नोव्हेंबरला.’ कतरिनाच्या या फोटोवर असंख्य चाहत्यांनी कमेंट करत तिचे तोंडभरून कौतुक करत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कतरिना-अक्षयचा “सूर्यवंशी’ चित्रपट दिवाळीनिमित्त 5 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
यात अजय देवगन आणि रणवीर सिंहही झळकणार आहे. याशिवाय कतरिना “टायगर-3’मध्ये सलमान खानसोबत पुन्हा एकदा रोमांस करताना दिसणार आहे.