जयपूर – कबड्डी खेळताना तरुणाचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळी सणात या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजस्थानातील टोंक जिल्ह्याच्या नवरंगपुरा येथे ही घटना घडली आहे.
दामोदर गुर्जर वय 21 असे या युवकाचे नाव आहे. दामोदर कबड्डी सामन्यादरम्यान खेळताना सर्व्हिस टाकायला गेला असता त्याला प्रतिस्पर्धी संघाने पकडल्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर मैदावरील लोकांनी त्यास तात्काळ रुग्णालयात दाखल दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यास मृत घोषित केले.