मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर आता भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर पलटवार करण्यात येत आहेत. त्यातच आता भाजप नेते मोहित कुंबोज यांनी आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी नवाब मलिकांचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे.
मोहित कुंबोज यांनी ट्वीट करत म्हटले, “पिक्चर तो अभी शुरू होई हैं, कल xx करते है आप को” असे म्हटले आहे. तसेच एक निवेदन जारी करत शनिवारी म्हणजेच आज ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले .
आपल्या निवेदनात मोहित कुंबोज यांनी म्हटले, “मी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एका खूप महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा पर्दाफाश होईल.”
दरम्यान याआधी नवाब मलिक यांनी एका पत्रकार परिषदेत मोहित कुंबोजचे नाव घेत गंभीर आरोप केले होते. त्यावेळी कुंबोज यांनी मलिक यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. तसेच आपण या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले होते.