Kangana Ranaut : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरुच आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र एकीकडे हा चित्रपट सुपरहिट होत असताना काहींनी या चित्रपटावर सडकून टीका केली आहे. यातच आता अभिनेत्री कंगना राणावतचा (Kangana Ranaut) देखील समावेश आहे. नुकतेच ट्वीटद्वारे (एक्स) कंगणाने या चित्रपटावरून रणबीरवर निशाणा साधला आहे.
कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट यशस्वी कामगिरी करू शकला नाही. यावरून ट्विटवर एका नेटकऱ्याने ‘तेजस’चं कौतुक करत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई का करु शकला असाही प्रश्न उपस्थित केला. ट्वीट करत कंगणाने लिहिले की, “माझ्या चित्रपटांबाबत मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरवली जाते. मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे.”
Paid negativity for my films is overwhelming, I have been fighting hard so far but even audiences are encouraging women beating films where they are treated like sex objects and asked to lick shoes, this is deeply discouraging for someone who has been dedicating her life for… https://t.co/VExJHxRE3P
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 8, 2024
पुढे ती म्हणाली, “प्रेक्षकांना असेच चित्रपट आवडतात, ज्यात महिलांना मारहाण आणि एखाद्या वस्तूसारखे वागवले जाते, बूट चाटण्यास सांगितले जाते. जे पुरुष एका स्त्रीला आपले जीवन समर्पित करतात अशा व्यक्तींसाठी असले चित्रपट पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. मला माझ्या आयुष्यातील सर्वात्तम वर्ष हे काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यात घालवायची आहेत.”
जावेद अख्तर यांनी देखील अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती. अॅनिमल चित्रपट सुपरहीट होणे हे धोकादायक असल्याचे त्यांनी म्हंटले होते. मात्र यावर अॅनिमल सिनेमाच्या टीमने त्यांना प्रत्युत्तर देखील दिले होते. दरम्यान, या चित्रपटावर टीका होत असताना या सिनेमाने गदर 2′ आणि ‘पठाण’ या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. नुकतेच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक सेलेब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. आलिया भट्ट, रणबीर कपूर, नीतू सिंग, महेश भट्ट, रश्मिका मंदाना, फराह खान, प्रेम चोप्रा, अनिल कपूर यासारखे अनेक कलाकार या पार्टीत उपस्थित होते.