Gold Silver Price Today – आज मंगळवार देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,३०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,७१० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,५४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,४६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
-२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,००८ रुपये आहे.
-२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,१९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
-प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,००८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१९० रुपये असेल.
नागपूर
-प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,००८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१९० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,००८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,१९० रुपये आहे.