bollywood – आपल्या स्पष्टवक्ते शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी कंगना राणावतने तापसी पन्नू तसेच स्वर भास्करवर अनेकदा आरोप केले आहे. तापसीनेही कंगनाच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. अशात जेव्हा कंगना राणावतने तापसी पन्नू आणि सहकलाकार स्वरा भास्कर यांना ‘बी ग्रेड अभिनेत्री’ म्हटले होते तेव्हा बॉलीवूडमध्ये चांगलाच वाद बघायला मिळाला होता. कंगनाला तिच्या या विधानावर काहींनी चुकीचे ठरवले होते तर काहींनी तिला पाठिंबा दिला होता.
अशात आता कंगनाने तिने केलेल्या ‘बी ग्रेड अभिनेत्री’ विधानावर आपलं स्पष्टीकरण दिल आहे. कंगना सध्या तिच्या ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिच्या आगामी चित्रपटासोबतच तापसी आणि स्वरा यांना ‘बी ग्रेड अभिनेत्री’ म्हण्टल्याबाबत सांगितले की,’जेव्हा कंगनाला तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांच्यातील चांगली अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कंगना आधी हसली आणि नंतर म्हणाली की दोघेही चांगल्या आहे. कंगनाने याआधी स्वरा आणि तापसीचे ‘बी ग्रेड अभिनेत्री’ म्हणून वर्णन केले होते, असे विचारले असता ती म्हणाली, ‘तापसी म्हणाली की कंगनाला डबल फिल्टरची गरज आहे, तर ती 2012 पासून संघर्ष करत होती आणि 2016 मध्ये तिला पहिल्यांदा यश मिळाले. त्यावेळी मला फिल्टरची गोष्ट सांगितली. त्यावेळी माझ्या बहिणीने उत्तर दिले होते की, या त्या अभिनेत्री आहेत ज्या कंगनाची कॉपी करतात. कंगनाने जे काही चित्रपट सोडले आहेत, ते ती करते.’
स्वरा भास्करबद्दल कंगना म्हणाली, ‘ती माझ्यासोबत ‘तनु वेड्स मनू’मध्ये होती. चित्रपटात ती नेहमी माझा हात धरून चालत असे. आम्ही दोघी खूप चांगल्या फ्रेंड्स आहोत. मग अचानक मला एक प्रॉब्लेम आला. जे अधिक उदारमतवादी आणि सहिष्णू बनतात त्यांना इतरांचे विचार आवडत नाहीत. स्वराबाबतही असेच घडले.’