बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूबद्दल बातम्या आल्या होत्या की अभिनेत्रीने तिचा प्रियकर मॅथियास बो याला गुपचूप लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तापसीने या सर्व बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता अभिनेत्रीने आपले मौन तोडले असून मॅथियाससोबतच्या तिच्या लग्नाची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे.
तापसी पन्नूने तिच्या गुप्त लग्नाबद्दल सांगितले. ती म्हणाली- ‘मला माझे वैयक्तिक आयुष्याबाबत सार्वजनिकरित्या सांगायला आवडत नाही. म्हणूनच मी लग्नाबाबत सांगितले नाही. ‘
तापसी पन्नूने लग्नाचे फोटो पोस्ट जारी करण्याबद्दल पुढे चर्चा केली. ती म्हणाली- ‘मला हे सार्वजनिक प्रकरण बनवायचे नव्हते, कारण मग याकडे कसे पाहिले जाईल याची मला चिंता वाटत होती. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या रिलीजची माझी कोणतीही योजना नाही आणि मला वाटत नाही की मी अद्याप त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे.’ असं म्हणत तिने गुपचूप केलेल्या लग्नाबाबत सांगितले आहे.
तापसी पन्नूचा वर्क फ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तापसी पन्नू तिचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2021 च्या क्राईम-सस्पेन्स चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ चा सिक्वेल आहे, जो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हे वाचले का ? जान्हवी कपूर गळ्यात बॉयफ्रेंड शिखर पहाड़िया नावाचं नेकलेस