मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच ती झी मराठीवरील पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहिली होती. यावेळी पहिल्यांदाच तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. नेहमीच बोल्ड आणि हॉट लुकमध्ये दिसणाऱ्या मलायकाचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीस पडला. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे.
झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मलायकाने हजेरी लावून मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करणार आहे. तर याबरोबरच व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये ती श्रेया बुगडेबरोबर मंचावर बेसनाचे लाडू वळताना दिसत आहे. त्याबरोबरच ती सलील कुलकर्णीकडे पाहून मराठीत म्हणते, “फक्त लड्डू देणार, पण मी नाही येणार हं.” त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळते. यावेळी मलायकाने सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती.
View this post on Instagram
मलायकाचा हा मराठमोळा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण हा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे. या कार्यक्रमात मलायका मराठी भाषेत बोलताना देखील दिसणार आहे. यानिमित्त मलायकाचा मराठमोळा अंदाज आणि मराठी भाषा ऐकण्यास मिळणार आहे. येत्या 5 नोव्हेंबरला हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.