मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींना मुंबई पोलिसांनी बुधवारी समन्स बजावले. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रक्षोभक वक्तव्ये करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भिन्न समुदायांत विद्वेष निर्माण करत असल्याचा दोन्ही भगिनींवर आरोप आहे.
Obsessed penguin Sena … Pappupro of Maharashtra, bahut yaad aati hai k-k-k-k-k-Kangana, koi baat nahin jaldi aa jaungi …. https://t.co/nwLyoq1J2i
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 21, 2020
यातच तिने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या या समन्सवर कंगनाने आता प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत ठाकरे सरकारलाही तिने डिवचलं आहे .
कंगना राणावत ट्विट
‘किती पछाडलेली आहे ही पेंग्विन सेना. महाराष्ट्राचे पप्पूप्रो. फार आठवण येते क-क-क-क कंगना, काही हरकत नाही. लवकरच येईन’.