खजुराहो – छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदे’मध्ये धर्मगुरु कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते.
Chhattisgarh Police arrest Hindu seer Kalicharan Maharaj from MP over derogatory comments against Mahatma Gandhi: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 30, 2021
यावेळी कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरताना गांधींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचं कौतुक केलं. दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्यावरून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी निराजी व्यक्त केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनीही या वादग्रस्त विधानावरून संताप व्यक्त केला गेला.
दरम्यान, मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगे श्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक कालीचरण महाराजला करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजविरोधात कारवाई करताना मध्य प्रदेश पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. छत्तीसगड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वास्तव्याची ठिकाणे बदलत होता. अखेर खजुराहोजवळील बगेश्वरी धाम येथील एका घरातून त्याला अटक करण्यात आली. हे घर त्याने भाडे तत्वावर घेतले होते.