वडूज, ( प्रतिनिधी) – इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियाचा वापर करून रील्स करून स्वतःचा दरारा निर्माण करणाऱ्या काही महाभागाना वडूज पोलिसांनी चांगलाचा दणका दिला आहे.
वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांनी काही युवकांवर कारवाईचा बडगा उगारला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात वातावरण खराब करणाऱ्या तीन युवकांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, वडूज शहारात दुचाकीवर फिरून काही युवकांनी व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
याबाबत वडूज पोलिसांनी अवि किरडकर, अवि इंगळे, हर्षद बनसोडे यांच्यावर कलम ११०/११७ अन्व्येय कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस कर्मचारी दऱ्याबा नरळे, गणेश शिरकुळे,, श्री कटरे यांनी ही कारवाई केली आहे.