मुंबई – बॉलीवूड सेलेब्स आणि सोशल मीडिया हे समीकरण नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूड सेलेब्स नेहमीच त्यांचा लाईफचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचा पोस्टवर त्यांचे चाहतेही कॉमेंट्स लाईकचा वर्षावर करता.
सोशल मीडियावर अनेकदा सेलेब्सला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो अशात आता बॉलीवूड अभिनेत्री काजोलने सोशल मीडिया पासून ब्रेक घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री काजोलने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्रेक घेतला आहे. काजोलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली.
काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवरून सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. तिच्या प्रोफाईलवर फक्त एक पोस्ट दिसत आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘मी सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे.’ काजोलने यामागचे कारणही सांगितले आहे. ती तिच्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे.
काजोलच्या या पोस्टमुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. तिच्या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत आहे. पोस्टवर अनेक यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. काजोलचे इन्स्टाग्रामवर १४.४ फोल्लोवेर्स आहे.