मुंबई – पुष्पा फेम अभिनेत्री अनसूया भारद्वाजने नुकतंच एका मुलाखतीत सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि त्याच्या सोशल मीडिया टीमवर धक्कादायक आरोप केले आहेत.यावेळी अभिनेत्रीने आपण सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे डिप्रेशनमध्ये गेल्याची देखील कबुली दिली. अनसूया आणि विजय देवरकोंडा एकेकाळी चांगले मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते.
हा वाद केवळ या दोन्ही स्टार्समधीलच नाही तर त्यांच्या फॅन्समध्ये देखील होत असल्याचे अनेकदा समोर आले होते. सोशल मीडियावर अनुसूया आणि विजय यांच्या चाहत्यांमध्ये अनेकदा फाईट सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. आता अनुसुयाने दावा केला आहे कि,विजयच्या सोशल मीडिया टीमने ट्रोलर्सला पैसे दिले होते आणि याची माहिती विजय देवरकोंडाला देखील होती.
अनसूयाने सांगितले की विजय देवरकोंडाच्या टीमने तिच्या ट्रोलर्सना पैसे दिल्याचे कळल्यावर तिला धक्का बसला. विजयलाही ही गोष्ट माहित असावी असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. एका इंग्रजी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने हा आरोप केला आहे.
“2019 मध्ये, विजय देवरकोंडाचे वडील एक चित्रपट करत करत होते आणि त्यांनी मला भूमिका ऑफर केली.त्यानंतर विजयच्या टीममधील कोणीतरी मला सांगितले की, मला शिवीगाळ करण्यासाठी विजयच्या टीमने ट्रोलर्सला पैसे दिले होते. हे ऐकून धक्का बसला असल्याचे अभिनेत्री सांगते. एवढेच नाही ती पुढे म्हणते,मला खात्री आहे विजयची सोशल मीडिया टीम त्याला विचारल्याशिवाय काही करणार नाही त्यामुळे या प्रकरणाची माहिती त्याला असेल.
पुष्पा चित्रपटात अनुसुयाने खतरनाक महिला व्हिलनची भूमिका साकारली होती. ती लवकरच ‘पुष्पा 2’ मध्ये देखील दिसणार आहे. तर विजय देवरकोंडाकडे ‘कुशी’ हा चित्रपट आहे, ज्यामध्ये तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.