Puneri Paltan vs U.P. Yoddhas, Pro Kabaddi League 2024 (Panchkula) :- प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत पुणेरी पलटण संघाने आपले वर्चस्व कायम राखताना युपी योद्धाज संघावर 40-38 अशी मात केली. पुणेरी संघाच्या विजयाचा शिल्पकार रेडर पंकज मोहिते हा ठरला. यासह, त्यांनी लीग टप्पा पहिल्या स्थानावर संपवला. दुसरीकडे, यूपी योद्धा अजूनही 11 व्या स्थानावर आहे आणि पराभवासह त्यांचा हंगाम संपला आहे.
A comeback of the 𝚑̶𝚒̶𝚐̶𝚑̶𝚎̶𝚜̶𝚝̶ 𝐏𝐚𝐥𝐭𝐚𝐧 order 💪
Aslam & Co. turned things around in style against Yoddhas to confirm their No. 1️⃣ spot 🫡#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PUNvUP #PuneriPaltan #UPYoddhas pic.twitter.com/wOG3cEARlu
— ProKabaddi (@ProKabaddi) February 21, 2024
या विजयासह पुणेरी पलटणने इतिहास रचला. PKL 2023-24 मध्ये, त्यांनी लीग टप्प्यात 96 गुण मिळवले आणि एका हंगामात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ बनला आहे. त्यानी गुजरात जायंट्सचा विक्रम मोडला आहे, ज्याने सीझन 6 मध्ये ही कामगिरी केली होती. याशिवाय पुण्याने प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
या सामन्याचे पहिले सत्र सुरु झाल्यावर खरेतर युपी योद्धा संघाने आघाडी घेतली होती. त्यांनी पुणेरी पलटणसारख्या बलाढ्य संघावर दडपण राखले होते. युपी संघाचा प्रमुख खेळाडू गगन गौडाने तब्बल 10 गुण मिळवत पुणेरी संघाच्या खेळाडूंच्या अफलातून पकडी केल्या.
पुणेरी संघाच्या पंकज मोहितेने त्याला तुल्यबळ लढत दिली मात्र, तरीही पुणेरी संघ पहिल्या सत्रात पिछाडी भरून काढू शकला नाही. गगनला साथ देत रेडर महिपालनेही वेगवान खेळ करत संघाची आघाडी आणखी वाढवली. पहिले सत्र संपले तेव्हा युपी संघ 28-15 असा भक्कम आघाडीवर होता.
#PKLSeason10 ( #MUMvTT Match 130 ) : यु मुम्बा-तेलगु सामना बरोबरीत…
दुसरे सत्र सुरु झाल्यावर मात्र, पुणेरी संघाने अत्यंत आक्रमक खेळ करत ही आघाडी कमी करण्याचा सपाटाच लावला. सामना संपण्यास पाचच मिनिटे राहीलेली असताना पुणेरी संघाने चक्क आघाडी घेतली. पुणेरी संघाच्या पंकज मोहितेने मोक्याच्या क्षणी गुण मिळऽले व संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याच्याच कामगिरीच्या जोरावर पुणेरी संघाने हा सामना जिंकला. तसेच यापूर्वीच बाद फेरीसाठी पात्र ठरलेल्या पुणेरी संघाने वर्चस्वही कायम राखले.